Sunday, March 18, 2018

The Vulture & the Girl



केविन कार्टरया जगप्रसिद्ध छायाचित्रकाराने काढलेले हे चित्र.
केविनचा जन्म साउथ आफ्रिका मधील जोहान्सबर्ग येथे १९६० साली झाला. फोटोग्राफीला सुरुवात केल्यानंतर केविनने लवकरच ‘the bang bang club’ला जॉईन केले. मुख्यतः साउथ आफ्रिकेतल्या शहरांमध्ये कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचे, अन्यायाचे फोटो काढणाऱ्यांना ‘bang bang club’ या नावाने ओळखले जाई. हिंसाचार, खून, दंगलीचे फोटो काढणे हा केविनच्या कामाचा भागच होता. अनेकदा यासगळ्या त्रासापासून स्वतःला तोडून ठेवण्यासाठी तो ड्रग्जचा सहारा घेत असे. याच ‘the bang bang club’ या अंतर्गत १९९३साली सुदान येथे पडलेल्या भयंकर अश्या दुष्काळाची बातमी कव्हर करण्यासठी गेला.
तिथे आयोड या एका छोट्याश्या गावात असलेल्या एका खाद्य पुरवठा केंद्राच्या काही अंतरावर त्याने हे चित्र काढले. या चित्रात दिसत असलेले छोटसे बाळ खरतर मुलगा आहे मात्र सुरुवातील हे छायाचित्र प्रकाशीत झाले तेव्हा मात्र ती मुलगी असल्याचे अनेकांचे मत झाले आणि त्याच नावाने ते चित्र प्रसिद्ध देखील झाले.
26 मार्च १९९३च्या द न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापून आले. त्यावेळी त्याखाली लिहिले होते, ‘A little girl, weakened from hunger, collapsed recently along the trail to a feeding center in Ayod. Nearby, a vulture waited’ (भुकेने व्याकुळलेली एक मुलगी, आयोड येथे असलेल्या ‘खाद्य केंद्रावर जाताना कोसळून पडते. शेजारी एक ‘गिधाड’ प्रतीक्षेत)
काही काळातच हे छायाचित्र जगातील अनेक मासिकांत, वृत्तपत्रात छापले गेले. ह्या छायाचित्रने जगभरातील लोकांना सुदान इथल्या भयानक अश्या दुष्काळाची जाणीव करून दिले. अनेकांनी सुदानला मदत पाठवायला सुरु केली. मात्र हि बातमी छापून आल्यावर टाईम्सला अनेकांनी पत्र पाठवून त्या मुलीच काय झालं? ती वाचली कि नाही? अशी विचारणा करायला सुरुवात केली.
मात्र हे छायाचित्र काढणाऱ्या केविनला याची काहीच कल्पना नव्हती. त्याच काम झाल्यवर तो तिथून निघून आला होता. शेवटी ३०मार्चला टाईम्सने संपादकीयमध्ये याला उत्तर दिले, “अनेक लोकांनी आमच्याकडे पत्राव्दारे मागील आठवड्यात प्रकाशित झालेल्या छायाचित्रातील मुलीचे पुढे काय झाले अशी विचारणा केली. मात्र छायाचित्र काढल्यावर छायाचित्रकाराने गिधाडाला पळवून लावले व लगेच पुढे वाटचाल सुरु केली. त्यामुळे ती मुलगी केंद्रापर्यंत पोहोचली कि नाही याबद्दल त्यास माहित नाही.”
केविन कार्टरने या संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगितले आहे की दिवसभर आयोडच्या केंद्रावर येणाऱ्या लोकांचे फोटो काढल्यानंतर तो गावाच्या बाजूला असलेल्या ओसाड प्रदेशावर काही फोटो काढता येतात का म्हणून एकटाच बाहेर पडला. जवळच एका लहान मुलीच्या जोरजोरात धापा टाकण्याच्या आवाजाने त्याचे त्याकडे लक्ष गेले. केंद्रावर पोहोचण्याच्या प्रयत्नासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करणारी एक छोटी चिमुरडी केंद्राच्या रस्त्यावरच कोसळली होती आणि त्याबाजूला तिच्या मृत्यूची वाट पाहत एक गिधाड. त्याने सुमारे २० मिनिटे ते गिधाड तिथून उडून जाईल याची प्रतीक्षा केली. मात्र तसे झाले नाही तेव्हा त्याने ह्याचे छायाचित्र घेतले आणि गिधाडाला पळवून लावले,  त्या चिमुरडीने तोपर्यंत अंगात जोर आणूस कशीबशी केंद्राकडे चालायला सुरुवात केली होती. मात्र केविन लगेचच तिथून निघून गेला. केविन म्हणतो,” मी सिगारेट पेटवली, आणि एका झाडाखाली बसून एकटाच तीन तास रडत होतो.”
सुदान येथील रोगांची लागवण पत्रकारांना होऊ नये यासाठी त्यांना कोणत्याही व्यक्तीला हात लावण्याची परवानगी नव्हती. मात्र अनेकांनी केविनवर त्या मुलीला मदत न केल्याबद्दल टीका केली. पीटर्सबर्ग टाईम्सने या बद्दल लिहिताना म्हणले, “ एका चिमुरडीच्या त्रासाला फोटोत कैद करण्यासाठी स्वतःच्या कॅमेराची लेन्स adjust करणारा माणूस म्हणजे त्या ठिकाणी हजर असलेलं दुसर  गिधाडच”
ह्या फोटोला मानाचा असा पुलित्झर पुरस्कार मिळाला मात्र केविन त्या मुलीचे नेमके झाले काय ह्या प्रश्नाने आता केविनला सुद्धा छळायला सुरु केली होती. शेवटी हा फोटो काढल्यानंतर सुमारे ६ महिन्यांनी केविन कार्टरने आत्महत्या केली आणि स्वतःला या त्रासातून मुक्त केले.
केविनची suicide note म्हणते...”मला निराशेने ग्रासले आहे...माझ्याकडे फोन घ्यायला, घराचे भाडे भरायला, मुलांचा सांभाळ करायला, कर्ज फेडायला पैसा नाही....मृत्यू, मृतदेह, संताप, दुखः ह्या सगळ्याच्या आठवणी मला छळायलाच लागल्या आहेत....आठवणी....जखमी, भुकेल्या चिमुरड्या मुलांच्या, पोलिसांच्या, लोकांना मारणाऱ्याच्या... मी केनला (नुकतीच मृत्यूमुखी पडलेली केविनची सहकारी) भेटायला जातो आहे..मी जर नशीबवान असेन तर कदाचित तिला भेटेनही.....”

No comments:

Post a Comment

The story how we stopped 8 children from migrating for sugar-cane cutting with their parents....

  Hope is a good thing, may be best of things and no good thing ever dies... Our Fellows were very much disturbed when they got to know that...